ई-टेंडरिंगची राष्ट्रवादीकडून प्रशंसा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ई-टेंडरिंगची राष्ट्रवादीकडून प्रशंसा

Share This

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक निधीतून होणार्‍या विकासकामांना ई-टेंडरिंग पद्धतीमुळे विलंब लागत असल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होत असताना राष्ट्रवादीकडून मात्र ई-टेंडरिंग पद्धतीबाबत कौतुक होत आहे. यामुळे अनेक कंत्राटदार उपलब्ध होत असल्याने विकासकामे जलदगतीने होत असून या कामांचा दर्जाही चांगला राखण्यात मदत होत असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले.

नगरसेवक निधी तसेच प्रभाग समितीतील विकास निधीसाठी २६ मार्चपर्यंत कार्यादेश देण्याची मुदत असून २४ मे कामाची बिले सादर करता येणार असल्याचे सांगत पिसाळ यांनी एस. वॉर्डमधील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, असिस्टंट इंजिनीयर, ज्युनियर इंजिनीयर यांनी ई-टेंडरिंग पद्धत समजून घेत त्याप्रमाणे त्वरित कार्यवाही केल्यामुळे या विभागातील आपला १00 टक्के निधी विकासकामांसाठी वापरला गेल्याचे त्यांनी सांगितले.दरम्याम, ई-टेंडरिंगमुळे भ्रष्टाचारास पायबंद बसला असून अनेक कंत्राटदार नमल्याने कामाचा दर्जाही चांगलाच राहत असल्याचे पिसाळ यांनी सांगत आयुक्तांनी आणलेली ही पद्धत यशस्वी होऊ शकते, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages