पोलिस विभागाची माफी मागतो - आमदार क्षितीज ठाकूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलिस विभागाची माफी मागतो - आमदार क्षितीज ठाकूर

Share This

पोलिस विभागाची माफी मागतो, त्या अधिकार्‍याची नाही - आमदार क्षितीज ठाकूर

मुंबई - पोलिसांच्या विरोधात माझे भांडण नाही, त्या अधिकार्‍याची भाषा अश्लिल होती, चुकीची होती त्यामुळे त्याची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य विधिमंडळात पोलिस अधिकार्‍याला मारहाण करण्याचा आरोप असलेल्या आमदार क्षितीज ठाकूर यांनी केले आहे.

विधिमंडळातील संपूर्ण प्रकारात सभागृहातील आमदार माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. झालेल्या प्रकाराची सर्व जबाबदारी मी माझ्यावर घ्यायला तयार आहे. या प्रकरणात जर मी दोषी अढळलो तर, राजीनामा देण्याची माझी तयारी असल्याचे आमदार ठाकूर यांनी म्हटले आहे.

मंगळवारी दुपारी निलंबीत सहायक वाहतूक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या गॅलरीत काही आमदारांकडून जबर मारहाण करण्यात आली होती.  आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासह आमदार राम कदम, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार राजन साळवी आणि आमदार जयकुमार रावल यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे.  दिवसभर माध्यमांमध्ये आमदारांवर मारहाणीचा आरोप झाल्यानंतर हे सर्व आमदार क्षितीज ठाकूरसह सायंकाळी मंत्रालय परिसरात पत्रकारांच्या समोर आले.

यावेळी आमदार ठाकूर यांनी निलंबीत सुर्यवंशी हेच अरेरावी करत होते. त्यांची भाषा अश्लिल आणि अर्वाच्च होती. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांशी कसे बोलावे याचे भान त्यांना नाही. त्यांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज आहे. कोणत्याही आमदारांनी त्यांना मारहाण केले नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

सोमवारी वांद्रे वरळी सी-लिंकवर झालेल्या प्रकाराचे मोबाईल शुटिंग त्यांनी पत्रकारांना दाखवले. त्याची सीडी तयार केली असून ती माध्यमांना देणार आहे. जर मी चुकीचे वागलो असतो तर मी शुटिंग कशाला केली असती असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.   


सूर्यवंशींना मारहाण केली नाही - राम कदम 
पोलिस विभागाची माफी मागतो, त्या अधिकार्‍याची नाही - आमदार क्षितीज ठाकूर
मनसे पक्ष कायम पोलिसांच्या हिताचे काम करत आला आहे. निलंबीत पोलिस अधिका-याच्या विरोधात आज हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला त्यावेळी तो सभागृहाच्या गॅलरीत बसलेला होता. सभागृहाच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला जातो त्याला तिथे उपस्थित राहण्याचा अधिकार नाही. असे असताना सूर्यवंशी तिथे उपस्थित होता आणि वरूनच अश्लिल हातवारे आणि आमदारांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे अनेक आमदार गॅलरीकडे गेले. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला धक्का दिला. मी खाली पडलो होतो.
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चूकीच्या असल्याचे सांगत ते म्हणाले, त्यावेळी तिथे केवळ चार - पाच नव्हे तर जवळपास पन्नास आमदार होते.  माध्यमांच्या प्रतिनिधींना ज्या आमदारांचे चेहरे लक्षात आहेत त्याच आमदारांनी मारहाण केल्याचे माध्यमांमध्ये सांगितले गेले, असे सांगून त्यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला.

पोलिसांना मारहाण करण्याची माझ्या पक्षाची संस्कृती नसल्याचे कदम म्हणाले. माध्यांनी सभागृहातील व्हिडिओ फुटेज तपासून पाहावे त्यातून सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages