अर्थसंकल्पाचा जनतेशी परस्पर संबंध - मुणगेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अर्थसंकल्पाचा जनतेशी परस्पर संबंध - मुणगेकर

Share This


मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य जनतेशी परस्पर संबंध असतो. त्यामुळे केंद्र सरकारने प्राप्त परिस्थितीनुसार आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे व परिणामांचे भान व जाणीव ठेवून चांगला अर्थसंकल्प सादर केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खा. डॉ. भालचंद्र मुगणेकर यांनी केले. नॅशनल वेल्फेअर फाऊंडेशनने आयोजित केलेल्या 'केंद्रीय अर्थसंकल्प २0१३' या विषयावरील जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. पोलीस कल्याण संकुल सभागृह, भोईवाडा, नायगाव येथे हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अर्थतज्ज्ञ खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे अर्थसंकल्पावरील विचार ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला लोकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांनी केले होते. या कार्यक्रमाला आ. कालिदास कोळंबकर, आ. संजय दत्त, आ. सुभाष चव्हाण, राजन भोसले, महादेव शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages