लाचखोरी रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात दक्षता समिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोरी रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात दक्षता समिती

Share This
लाच घेतल्याच्या आरोप प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता समितीची नेमणूक करणार असल्याचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी सांगितले त्याचप्रमाणे कनिष्ठ पदावरील पोलिसांच्या वर्तणुकीची जबाबदारी वरिष्ठ पदावरील पोलिसांवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले 

नेहरूनगर येथील अनधिकृत बांधकामा संबंधी लाच घेतानाचे पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर पोलिस दलाची काळवंडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आयुक्त सत्यपाल सिंह यांनी पावले उचलली आहेतउपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून भ्रष्ट पोलिसांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले पोलिसांच्या गैरव्यवहाराची माहिती दक्षता समिती उच्चअधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल असे सिंह यांनी सांगितले या शिवाय कॉन्स्टेबल पदावरकाम करणाऱ्या पोलिसांच्या वर्तणुकीसाठी त्याच्यावरील सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर जबाबदारआहेत यानंतर कोणत्याही पोलिसासंबंधी भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास त्याच्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages