मातोश्रीवरून आदेश निघे, रिपब्लिकन दल हाले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मातोश्रीवरून आदेश निघे, रिपब्लिकन दल हाले

Share This


मुंबई - ‘मुंबईत रेसकोर्स कशाला पाहिजे? श्रीमंताची ही घोडी नवी मुंबईला पाठवा आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवा,’ हे बोल आहेत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचे. बुधवारी आठवले यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची री ओढली.

इतके दिवस रेसकोर्सबद्दल ब्र न उच्चारणारे रामदास आठवले आज इतक्या तावातावाने का बोलत आहेत, असाच प्रश्न यानिमित्ताने पडला होता. मात्र, त्याचा उलगडाही झाला. आठवले यांना सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर भेटले आणि त्यानंतर तातडीने पत्रकार परिषदेचे नियोजन झाल्याची माहिती सर्वांना समजली. त्यामुळे रेसकोर्सप्रकरणी आठवले करत असलेला त्रागा केवळ ‘मातोश्री’च्या इशार्‍यावर चाललेला असल्याचे उघड झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages