सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेबाबत राष्ट्रवादीची मोहीम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेबाबत राष्ट्रवादीची मोहीम

Share This
मुंबई : सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छता व दुर्गंधीमुळे महिलांची मोठय़ा प्रमाणावर कुचंबणा होते. याचा महिला वर्गाच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला शौचालयांच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार १ जून रोजी दक्षिण मुंबईतील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शौचालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालयात महिलांना अत्यंत गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात वावरावे लागते. तुंबलेली शौचकुपे, अपुरा पाणीपुरवठा, मोडकळीस आलेल्या कचराकुंड्या, स्वच्छतेचा अभाव आणि इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. १ जून रोजी सकाळी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर आझाद मैदानाशेजारील सार्वजनिक शौचालयातील महिला कर्मचार्‍यांना स्वच्छतेबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर जी. टी. रुग्णालय, हज हाऊस परिसर आणि सीएसटी रेल्वे स्थानक येथील शौचालयातील कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages