तीन हजार शिक्षक हक्काच्या थकबाकीपासून वंचित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन हजार शिक्षक हक्काच्या थकबाकीपासून वंचित

Share This
मुंबई : पालिका प्रशासन आणि विविध कामगार संघटना यांच्यामध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याबाबत नोव्हेंबर २0११ मध्ये झालेल्या सामंजस्य करारापोटी मिळावयाच्या हक्काच्या थकबाकीपासून अजूनही तब्बल ३१३२ शिक्षक वंचित असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. या शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणीची थकबाकी विनाविलंब मिळवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच थकबाकीची बिले पेन ड्राईव्हद्वारे स्वीकारण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी शिक्षक सभेने शिक्षण उपायुक्त सुनील धामणे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासन व विविध कामगार संघटना यांच्यामध्ये नोव्हेंबर २0११ रोजी वेतनश्रेणी संबंधात सामंजस्य करार होऊन कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. सहाव्या वेतन आयोगानुसार एप्रिल २0१२ ते जुलै २0१२ पर्यंत शिक्षण विभागातील सुमारे ६१७७ कर्मचार्‍यांना सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे थकबाकीची रक्कम मिळाली असली तरी अजून ३१३२ शिक्षक हक्काच्या थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा शिक्षकांना त्वरित थकबाकी मिळावी म्हणून प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच त्वरित थकबाकीची बिले पेन ड्राईव्हद्वारे स्वीकारावीत, अशी मागणी शिक्षक सभेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages