चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
http://m.facebook.com/ Sandeepkumaragarwal?v= timeline&refid=


मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत पुन्हा एकदा फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरून गरळ ओकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली असून मुंबईच्या चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये तसेच सायबर क्राइम विभागात गरळ ओकणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिपब्लिकन सेनेचे चेंबूर येथील नवनीत अहिरे यांना फेसबुक वरील http://m.facebook.com/ Sandeepkumaragarwal?v= timeline&refid= या लिंक वरून बाबासाहेबांबद्दल भडुवा आतँकबादी, सवर्णो का खून चुसने वाला व्याम्पायर,अंबेडकर को आरक्षण के आधार पर संबिधान निर्माण मेँ टाइपिँग कि नौकरी लगी थी,टाइपिँग मास्टर अंबेडकर आज होता तो किसी कोने मेँ 10 रुपये पेज के हिसाब से टाइपिँग कर रहा होता,मनुस्मृत्ति कि नकल कर के अंग्रेजोँ ने संबिधान बनाया उसी संबिधान को टाइपिँग करके कोइ मंदबुद्धि संबिधान निर्माता बन गया अशी कित्तेक आक्षेपार्य विधाने संदीप अग्रवाल नामक व्यक्तींने केली असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर नवनीत अहिरे, विनोद शिंदे, बाळासाहेब आठवले, इत्यादी आंबेडकरी जनतेने चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस निरीक्षक दरेकर व कांबळे यांनी तुमचे निवेदन घेतले आहे. तपास करून नंतर काय कारवाही करायची ते पाहू असे सांगितले. यावर आम्हाला एफ. आय. आर. दाखल करून हवा आहे असे सांगितल्यावर तसेच पत्रकारांचे फोन येत आहेत असे समजल्यावर पोलिसानी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव राठोड यांना फोन वरून प्रकार सांगितला असता राठोड यांनी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधून सदर लिंक बंद करण्यास सांगितले आहे. सायबर क्राइम विभागानेही येत्या २४ तासात या लिंक वरील आक्षेपार्य फोटो व कमेंट दिसणार नाही याची नोंद घेतली असून चेंबूर पोलिसांनी बुधवारी ( २९ मे) रात्री गुन्हा नोंद करून घेतला आहे.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सतत फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरून आक्षेपार्य विधाने फोटो टाकली जात असताना पोलिस मात्र सदर लिंक बंद करत आहेत. परंतु आता पर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडून लोकांसमोर किवा न्यायालयासमोर हजार केले नसल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून पोलिसानी आरोपीला समोर आणून कारवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
============================================================
PHOTOS

No comments:
Post a Comment