लहानांकडून मोठय़ांना रस्ता सुरक्षिततेचे धडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लहानांकडून मोठय़ांना रस्ता सुरक्षिततेचे धडे

Share This

मुंबई : सायन रेल्वे स्थानकाजवळ विविध शाळांमधील १00 हून अधिक मुलांनी एकत्र येत मानवी साखळी करून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात केली. सेफ किड्स फाऊंडेशन आणि यूएन जनरल असेम्बली यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १२ मे दरम्यान आयोजित रस्ता सुरक्षा मोहिमेचे माटुंगा वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुजाता पाटील आणि सेफ किड्सच्या कार्यकारी अधिकारी रुपा कोठारी यांच्या हस्ते उद््घाटन झाले. 

नेल्सन्स मंडेला यांची १३ वर्षांची नात झेनानीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. असा प्रसंग अन्य मुलांवर ओढवू नये यासाठी तिच्या स्मरणार्थ दरवर्षी या मोहिमेचे आयोजन करण्यात येते. ५ ते १४ वयोगटातील मुले रस्ते अपघाताचे सर्वाधिक बळी ठरतात. म्हणूनच या उपक्रमातून संस्थेने नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचा निश्‍चय केला आहे. रस्ता ओलांडते वेळी भारतात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा दरवर्षी ७ हजार ८00 इतका आहे, तर जगभरात ही संख्या १,३३,000 इतकी असल्याची माहिती संस्थेने दिली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages