प्रसिद्धी माध्यमांमध्ये नवा दृष्टिकोन आवश्यक! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रसिद्धी माध्यमांमध्ये नवा दृष्टिकोन आवश्यक!

Share This

मुंबई : प्रसिद्धी माध्यमे ही समाज विकासाची प्रभावी माध्यमे असून समाजकारण, राजकारण आणि त्यासोबतच्या सर्व घडामोडींचा वेध घेणे हे माध्यमांचे लक्ष्य असते. मात्र गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे प्रश्न दुर्लक्षित राहिल्याचेच दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेता देशाच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या हिंदी विभागाकडून शाहीर अमरशेख सभागृहात आफताब आलम संपादित आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पहिल्या पत्रकारिता कोषाचे प्रकाशन झाले, त्या वेळी डॉ. नरेश चंद्र बोलत होते.

या वेळी विविध वर्तमानपत्रांचे संपादक एकत्र आले होते. सर्वांनी या वेळी आपले विचार या ठिकाणी मांडले. जन्मभूमीचे संपादक कुंदन व्यास यांनी पत्रकारितेमध्ये गांभीर्य शिल्लक राहिले नसल्याने ही बाब चिंतेची असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यकालीन पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यांच्यातील बदलांबाबत पत्रकारांनी या वेळी माहिती दिली. या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ल, पत्रकार ओमप्रकाश तिवारी, राष्ट्रीय सहारा उर्दूचे समाचार संपादक अकलीम शेख, इंडिया टीव्हीचे मुंबई ब्युरो चिफ जयप्रकाश सिंह आदी उपस्थित होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. करुणा शंकर उपाध्याय आणि डॉ. अनंत श्रीमाली यांनी समारंभाचे संचालन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages