नेपाळच्या माजी उप पंतप्रधानांची मुंबई पालिकेला भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नेपाळच्या माजी उप पंतप्रधानांची मुंबई पालिकेला भेट

Share This

नेपाळच्या माजी उप पंतप्रधान सुजाता कोईराला यांनी मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांची पालिकेत सदिच्छा भेट घेतली. प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी महापालिकेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती कोईराला यांना दिली.  तर समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी नेपाळमध्ये सुरू असलेल्या विविध बदलांची नोंद घेत तेथील शासकीय पद्धतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. कोईराला यांनी भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधाबद्दल सांगून देशाच्या विविध विकासकामांमध्ये आणि घडामोडींमध्ये भारताने नेपाळला नेहमी सहकार्य केले असल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages