केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने प्रगती प्रतिष्ठान, भायखळा यांच्या वतीने व रोहिदास लोखंडे यांच्या प्रयत्नाने नुकताच संपन्न झाला.
या योजना मेळाव्यामध्ये भायखळा परिसरातील नागरिकांना आय.आय.टी. प्रशिक्षण, प्यान कार्ड, मागासवर्गीय व अल्पसांख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, रहिवाशी, लग्नाचा, जन्माचा, उत्पन्नाचा दाखला, इलेक्शन कार्ड, इम्लोयमेंट नोंदणी, कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्ती, जातीचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, ओ. बी.सी. महामंडळाचे कर्ज वाटप, जनश्री विमा योजना तसेच महिलांसाठीच्या विविध योजनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून विविध योजनांचे फॉर्म त्वरित भरून घेतले जात गेले. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने तसेच शासकीय कार्यालयात खेटे मारून, रांगा लावूनही आपल्याला या योजनांची माहिती व लाभ मिळत नसल्याने भायखळा परिसरातील हजारो नागरिकांनी या योजना मेळाव्यात सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment