`मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध असून याच कटिबद्धतेनुसार महापालिका क्षेत्रातील विविध मंडयांचे आवश्यकतेनुसार नूतनीकरण, पुनर्विकास, दुरुस्ती करण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्यावर्षी महापालिकेतर्फे ५० मंडया मुंबईकरांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या आहेत, तर यावर्षी देखील ५० मंडयांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वर्सोवा गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी लोकार्पित होत असलेली नूतनीकृत मंडई देखील याच प्रयत्नांचा भाग असून या मंडईचे अतिशय चांगल्याप्रकारे व सुविधात्मक नूतनीकरण केल्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करतो’’, असे गौरवाद्गार मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी काढले.
मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते (दि.०३.०५.२०१३ रोजी) वर्सोवा येथील महापालिका मंडईचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला महापालिकेतील सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक यशोधर (शैलेश) फणसे, आमदार अनिल परब, शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, माजी नगरसेविका राजुल पटेल व सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह मान्यवर मंडळी, मत्स्य व्यापारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना महापौर सुनिल प्रभु पुढे म्हणाले की, सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक यशोधर फणसे यांनी गेल्यावर्षभरात वर्सोवा परिसरात चांगले रस्ते बांधून घेणे, अत्याधुनिक दिवे बसविणे, मंडईचे नूतनीकरण करणे यासारखी विविध लोकोपयोगी कामे महापालिका प्रशासनाकडून करुन सकारात्मक बदल घडविला, याबद्दल फणसे यांचे विशेष अभिनंदन महापौरांनी केले. ही नागरी सेवा-सुविधांची कार्यमालिका यापुढेही चालू राहणार असून याअतंर्गत कोस्टल रोड, मढ आणि अक्सा परिसराला जोडणारा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहितीही महापौरांनी यावेळी दिली.

No comments:
Post a Comment