मुंबईत दहशतवादी हल्‍ल्‍याची धमकी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दहशतवादी हल्‍ल्‍याची धमकी

Share This


मुंबई- मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्‍ला करण्‍याची धमकी दिली आहे. अल जिहाद नावाच्‍या संघटनेने ही धमकी दिली असून मुंबईतील महत्त्वाच्‍या सार्वजनिक ठिकाणी स्‍फोट घडवून हाणण्‍याचा उल्‍लेख या धमकीमध्‍ये करण्‍यात आला आहे. त्‍यात प्रामुख्‍याने रेल्‍वे स्‍थानक, बस स्‍थानक व इतर स्‍थळांना लक्ष्‍य करण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. या धमकीमुळे मुंबईत अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. मुंबई वेस्‍टर्न नेव्‍हल स्‍टेशनला धमकीचे पत्र मिळाले आहे. त्‍यात मुंबईसह हैदराबाद आणि बंगळुरुमध्‍येही स्‍फोट घडवून आणण्‍याचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages