झुनझुनवाला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे ४३ लाख रुपये थकवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झुनझुनवाला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे ४३ लाख रुपये थकवले

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com ( वृत्तसंस्था )
घाटकोपर पश्चिम येथे असलेल्या सुप्रसिद्ध अशा रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने आपल्या माजी विद्यार्थ्यांकडून डिपोझीट म्हणून घेतलेले ४३ लाख रुपये परतच केले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी झुनझुनवाला महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून २००१ ते २०१३ या कालावधीत किती  फी, ल्याब, लायब्ररी, काऊनशन फी इत्यादी साठी किती डीपोझीट घेतले, त्यापैकी किती फी किवा डीपोझीट विद्यार्थ्यांना परत केले याबाबतची माहिती  मागवली होती. याबाबत दिलेल्या माहिती नुसार सन २००१  ते २०११ - १२ पर्यंत महाविद्यालयाकडे १ करोड ४६ लाख ४३ हजार ७४५ रुपये जमा झाले होते. त्यापैकी महाविद्यालयाने १ करोड ३ लाख ४५ हजार ९११ रुपये विद्यार्थ्यांना परत केले आहेत.

एकूण फी व डीपोझीटसाठी घेतलेल्या १ करोड ४६ लाख ४३ हजार ७४५ रुपयांपैकी महाविद्यालयाने १ करोड ३ लाख ४५ हजार ९११ रुपये विद्यार्थ्यांना परत केले असले तरी महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे आजही ४२ लाख ९७ हजार ८३४ रुपये पडून आहेत. हे  ४३ लाख रुपये ज्या विद्यार्थ्यांचे बाकी आहेत ते त्या संबंधित विद्यार्थ्यांना त्वरित परत करावे अशी मागणी पारगावकर यांनी झुनझुनवाला महाविद्यालयाला २३ एप्रिल २०१३ रोजी पत्र पाठवून केली असली तरीही सदर रक्कम अद्यापही संबंधित विद्यार्थांना परत केली नसल्याचे समजते.

सन २००१  ते २०११ - १२ पर्यंत झुनझुनवाला महाविद्यालयातून शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांची फी किवा डीपोझीट मिळाले नसेल अशा विद्यार्थांचे हे पैसे असल्याने अशा विद्यार्थांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधून आपले पैसे परत घ्यावेत असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages