जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठीही भूखंडाची मागणी
मुंबई - मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी मागणी नाना शंकरशेट स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नानांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीचे नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा समितीने या वेळी दिला.
स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस, माजी नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर, ऍड. सच्चिदानंद हाटकर, उदयराज गडकरी या वेळी उपस्थित होते. या मागणीसाठी 2006 मध्ये सुनील प्रभू व सन 2011 मध्ये चोणकर यांनी मुंबई महानगरपालिकेत ठराव मांडला होता; मात्र त्यावर काही कार्यवाही झाली नाही, असे पदाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
'नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी भूखंड देण्याची मागणी 1991 मध्ये अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने केली होती. सन 2010 मध्ये मी भूखंडाच्या मागणीसाठी महापालिकेत ठराव मांडला होता. त्यानंतर वडाळा येथे भूखंड देण्याचा ठराव मुंबई महापालिकेने 12 जुलै 2013 रोजी मंजूर केला. त्या ठरावाची अंमलबजावणी करीत पालिकेने 31 ऑगस्टपूर्वी भूखंडाचे हस्तांतरण करावे,' अशी मागणी चोणकर यांनी याप्रसंगी केली. 31 जुलै 2015 रोजी नाना शंकरशेट यांची 150 वी पुण्यतिथी आहे; तोपर्यंत स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी भूखंडाचे पालिकेने हस्तांतरण करावे, असे ते म्हणाले.
याआधी व्हिक्टोरिया टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी आम्ही करीत होतो; मात्र 1996 मध्ये त्या टर्मिनसला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी करीत आहोत, असे चोणकर म्हणाले.
डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध
मुंबई सेंट्रल टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) केली आहे; मात्र या मागणीला शंकरशेट स्मारक समितीने विरोध दर्शविला आहे.

No comments:
Post a Comment