मीडियाशी बोलू नका - कॉलेज विद्यार्थ्यांना सरकारचा अजब फतवा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मीडियाशी बोलू नका - कॉलेज विद्यार्थ्यांना सरकारचा अजब फतवा

Share This

मुंबई : कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची परवानगी घेतल्याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अन्यथा पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा अजब फतवा महाराष्ट्र सरकारने काढला आहे. याविरोधात विद्यार्थी वर्गात मोठय़ा प्रमाणात असंतोष पसरला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने सोमवारपासून आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.

कॉलेज विद्यार्थ्यांना एकीकडे निवडणुकीचा अधिकार मिळत असतानाच दुसरीकडे मात्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांवर प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा फतवा काढून विद्यार्थ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. कुणी विद्यार्थी प्राचार्यांची पूर्व परवानगी न घेता मीडियाशी बोलला तर त्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याच्या या सरकारच्या भूमिकेचा विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने दंड थोपटून सरकारला आव्हान दिल्याने सरकारची मोठी पंचाईत झाली आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठाने सरकारच्या या अध्यादेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असल्याचे वृत्त आहे, तर अशा प्रकारे दंड आकारण्याचा अधिकार सरकारला असल्याचा दावा उच्चतंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनीही या फतव्याला विरोध दर्शविला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages