रेल्वे अपघातात तरुणाने गमावला डावा पाय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे अपघातात तरुणाने गमावला डावा पाय

Share This
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथे सोमवारी १२.५३च्या पवन एक्स्प्रेसने आपल्या आईवडिलांसोबत मूळ गावी निघालेल्या २५ वर्षीय तरुणाचा गाडीत चढते वेळी पाय घसरला व तो ट्रेनखाली आला. यात त्याने डावा पाय गमावला. त्याला उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र घटना गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त अनुप सुरज हा आपल्या आईवडिलांसोबत मुझफ्फरपूर येथे गावी निघाला होता. शनिवारी पवन एक्स्प्रेसचे ए.सी. डब्याचे तिकीट होते. एसी डब्यात अनुपने आपल्या आईवडिलांना बसण्यास सांगितले आणि सामानासहित अनुप गाडी पकडत असताना गाडी सुरू झाली. गर्दी असल्याने अनुपला सामानासहित चढणे कठीण जात होते. म्हणून अनुपने गडबडीत गाडीत चढताना ट्रेनच्या स्टीलच्या हॅण्डला पकडले, मात्र हॅण्डल पाण्याने भिजले असून अनुपचा हात सटकला आणि तो ट्रेनखाली पडला. एका दक्ष नागरिकाने पळत जाऊन ट्रेनची चेन खेचून गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतर जीआरएफ आणि आरपीएफ यांच्या प्रयत्नांनी त्याला अध्र्या तासाने बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनुपचा डावा पाय कापला गेला. जखमी अवस्थेतील अनुपला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages