मुंबई : प्रभाग २५च्या काँग्रेस नगरसेविका आणि सध्याच्या 'आर' दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षा डॉ. अजंता राजपती यादव यांनी विकासकामासाठी कधीही तडजोड केली नाही. रहिवाशांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे महिलांमध्ये त्या अधिक प्रिय आहेत. आपल्या विभागातील साफसफाईसाठी कमी मनुष्यबळ असतानाही ते पुरेसे आहे, असे चुकीचे सांगून दिशाभूल करणार्या अधिकार्याला शुक्रवारी चांगलेच झापले. डॉ. यादव यांचा रूद्रावतार पाहताच अधिकार्यांची भंबेरी उडाली.
आपल्या प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्यासाठी त्यांनी दौरा काढला होता. महिंद्र अँड महिंद्र कंपनी समोरील नूतन पुलाची पाहणी करून त्या पुढे निघाल्या असता आपल्या स्वत:च्या वॉर्डात केवळ ४ सफाई कर्मचारी असल्याचे त्यांना कळताच त्यांचा पारा चढला. त्यांनी जाब विचारताच अधिकारी त्यांना खोटी माहिती पुरवू लागले. याचा त्यांना प्रचंड राग आला. 'खोटे सांगू नका. मी जनतेसाठी हे करतेय,' असे म्हणत त्यांनी आवाज चढवताच अधिकार्यांची भंबेरी उडाली. मृदूभाषी यादव भडकल्याचे पाहताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

No comments:
Post a Comment