फुले शाहू आंबेडकर यांचे सतत नाव घेत मागासवर्गीय जनतेच्या मतावर निवडून येवून राज्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार कडून मंत्रालयातील मागासवर्गीयांची हजारो पदे रिक्त असतानाही हि पदे भरलीच जात नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी मंत्रालयातील रिक्त पदांबाबत मागवलेल्या माहिती मधून समोर आले आहे. मागील आठवड्यात आपण याच सदरामधून मंत्रालयामधील आदिवासी विभाग, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तिन विभागाच्या रिक्त पदांची माहिती वाचली असेल आता मंतारालायामधील आणखी काही रिक्त पदांची माहिती महाराष्ट्रामधील लोकांना माहिती असावी म्हणून पुढे देत आहोत. मंत्रालयामधून मिळालेल्या माहिती नुसार मंत्रालयामध्ये जो काही रिक्त पदांचा अनुशेष आहे हा सर्व मागासवर्गीयांचा आहे हि विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी पुरवठ्याचे प्रकल्प राबवले जाणाऱ्या, प्रकल्पांना मंजुरी देणाऱ्या महाराष्ट्रामधील जनते पर्यंत पाण्याची व्यवस्था करणाऱ्या जलसंपदा विभागामध्ये सरळ सेवा भरतीमधील अ वर्गाची ७८३ पदे मंजूर असून २०११ पर्यंत ३९५ पदे रिक्त होती १७ पदांचा अनुशेष होता सध्या ९ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गामध्ये ६२७५ पदे मंजूर असून ६१४ पदे रिक्त होती सध्या २६९ पदांचा अनुशेष बाकी आहे. क वर्गामध्ये १९०५७ पदे मंजूर असून सध्या ५६८ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गामध्ये ९१८४ पदे मंजूर असून सध्या ३४४ पदांचा अनुशेष बाकी आहे. पदोन्नती द्वारे अ वर्गामध्ये २१४९ पदे मंजूर आहेत त्यापैकी ३३ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गामध्ये १२५७ पदे मंजूर असून ८० पदांचा अनुशेष बाकी आहे. क वर्गामध्ये ४६४० पदे मंजूर असून ५८ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गाची ९८४ पदे अम्न्जूर असून सध्या १८ पदांचा नौशेष बाकी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित आश्रम शाळा विभागात सरळसेवा भरतीमध्ये अ आणि ब वर्गात पदेच नसल्याचे माहिती अधिकारामध्ये कळवण्यात आले आहे. क वर्गामध्ये ६९९४ पदे मंजूर असून त्यापैकी ३४२ पदांचा अनुशेष बाकी आहे. या मध्ये फक्त ओबीसी ची २३६ पदे आहेत.ड वर्गामध्ये ५६२९ पदे मंजूर असून त्यापैकी ६१४ पदांचा अनुशेष बाकी आहे. या मध्ये फक्त ओबीसी ची ४६० पदे आहेत. पदोन्नती भरतीमध्ये सुद्धा अ,ब आणि ड वर्गात पदेच नसल्याचे माहिती अधिकारामध्ये कळवण्यात आले आहे. तर क वर्गामध्ये १११६ पदे मंजूर असून ८८ पदांचा अनुशेष बाकी आहे.
महसुल व वन विभागामध्ये सरळसेवा भरती द्वारे अ वर्गाची ४७१ पदे मंजूर असून ९ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गामध्ये ७७९ पदे मंजूर असून ८ पदांचा अनुशेष बाकी आहे. क वर्गाची २४६२७ पदे मंजूर असून ४८५ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गाची ७२१० पदे मंजूर असून ११३ पदांचा नौशेष बाकी आहे. पदोन्नती भारती द्वारे अ वर्गाची ८३३ पदे मंजूर आहेत त्यापैकी ४ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गात १५५६ पदे मंजूर असून कोणताही अनुशेष नाही. क वर्गात ११६९९ पदे मंजूर असून ४३ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गाची ३९२ पदे मंजूर असून ४ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे कळवण्यात आले आहे.
मंत्रालयामध्ये आदिवासी विभाग, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग याच प्रमाणे जलसंपदा विभाग, अनुदानित आश्रम शाळा विभाग, महसुल व वन विभाग या विभागामध्ये सुद्धा मागासवर्गीयांच्या हजारो पदांचा अनुशेष बाकी असताना महाराष्ट्रा मध्ये राज्य करणाऱ्या व सतत फुले शाहू आंबेडकर यांचे सतत नाव घेणाऱ्या आघाडी सरकार मधील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांचे हि रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व विभागामध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार चालवणारे काँग्रेस राष्ट्रवादी वाले जसे दुर्लक्ष करत आहेत तसेच मागासवर्गीयांच्या नावाने उघडलेल्या संस्था, युनिअन व पक्ष तसेच त्यांचे प्रमुख यांचे सुद्धा रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत आहे. मागासवर्गीयांची हजारो पदे रिक्त असताना मागासवर्गीयांची हि रिक्त पदे लवकरात लवकर भरवित या साठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
Mob. No.- 09969191363

No comments:
Post a Comment