१९९५ पूर्वीच्या खरेदी केलेल्या झोपड्या एसआरएसाठी पात्र - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१९९५ पूर्वीच्या खरेदी केलेल्या झोपड्या एसआरएसाठी पात्र

Share This
मुंबई : मुंबईतील १९९५ पूर्वीच्या झोपड्यांना एसआरए योजना लागू होते. मुंबईत १ जानेवारी १९९५ रोजी अस्तित्वात असलेल्या झोपड्या आणि त्यात सध्या वास्तव्यास असलेल्या व्यक्ती एसआरएसाठी पात्र ठरतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुंबईबाबतच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

सरकारने १९९५ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या होत्या. त्या एसआरएसाठी पात्र ठरतात. मात्र ज्यांनी १९९५ नंतर ती झोपडी विकत घेतली असेल व जो तेथे सध्या वास्तव्य करत असेल अशांना त्याचा लाभ मिळत नव्हता. मूळ मालकालाच त्याचा लाभ होत होता. आजच्या निर्णयामुळे अशा झोपड्या विकत घेतलेल्या व सध्या वास्तव्यास असणार्‍या झोपडीधारकाला आता एसआरएचा फायदा घेता येणार आहे. धारावीतील सेक्टर-५ मध्ये १८ मजल्याची इमारत उभी करण्याचे काम प्रगतीपथावर असून त्या माध्यमातून १८00 सदनिका उपलब्ध होणार आहेत. धारावीकरांची ४00 चौ. फुटांची मागणी आहे, पण ज्याची झोपडी ३00 चौ. फुटांपेक्षा जास्त असेल त्यालाच ४00 चौ. फुटांची सदनिका मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे इमारत दुर्घटना टाळण्यासाठी अनधिकृत इमारतींच्या जमिनी ताब्यात घेऊन तेथे म्हाडा, सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतरांकडून इमारती उभ्या करून संबंधित सदनिकाधारकांना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईतील सहार उन्नत मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री मार्गावरील पांजरापोळ ते घाटकोपर मार्ग, अमर महल पूल, वर्सोवा-अंधेरी मेट्रो प्रकल्प, वडाळा ते चेंबूर मोनो रेल्वे मार्गासह शहरात सुरू असलेल्या सुमारे ५ हजार कोटींच्या विकासकामांचे ३१ डिसेंबर २0१३ पर्यंत लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages