झाड कोसळून अनेक झोपड्यांचे नुकसान / मदतीऐवजी भुर्दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झाड कोसळून अनेक झोपड्यांचे नुकसान / मदतीऐवजी भुर्दंड

Share This


मुंबई : विक्रमी पावसाने मुंबईकरांची दैना उडाली असताना माहीम न्यू गिरगावकर वाडी येथील खाजगी जागेत असलेल्या झोपड्यांवर प्राचीन वडाचे झाड कोसळल्याने अनेकांच्या झोपड्यांची पडझड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर महानगरपालिका व अग्निशमन दलाने झाडाचा काही भाग कापला; परंतु मोठा भाग तसाच झोपड्यांवर पडलेला असल्याने जीवाच्या भीतीने बाधित झोपडीधारक इतरत्र राहत आहेत. या झोपडीधारकांना मदतीऐवजी भलेमोठे झाड कापून बाजूला करण्यासाठी १0 हजारांचा भुर्दंड झोपडीधारकांना सोसावा लागणार आहे.

माहीम (प.), न्यू गिरगावकर वाडी, शीतलादेवी मंदिर रोड या ठिकाणी असलेल्या सुमित सदन या इमारतीच्या आवारात असलेले प्राचीन वडाचे झाड मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसामुळे उन्मळून इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपड्यांवर पडले. यात १0 ते १२ झोपड्यांचे नुकसान झाले, मात्र कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिकेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी झाडाचा काही भाग बाजूला करून ते निघून गेले. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी झोपड्यांवरील भलेमोठे झाड जशाच्या तशा अवस्थेत पडलेले आहे. ते कधीही खाली कोसळून झोपड्यातील लोकांना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. जीवाच्या भीतीने बाधित झोपडीधारक आपल्या घरात राहण्यास घाबरत आहेत. स्थानिक नगरसेवक, आमदार आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या, मात्र कोणीही मदत केली नाही. उलट झोपड्यांवर पडलेले झाड तुमच्या खर्चाने कापून बाजूला करा, असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आल्याचे येथील दक्ष नागरिक साबन्ना साडक यांनी सांगितले. ठेकेदाराने या कामासाठी १0 हजार रुपये घेऊन झाड कापण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आधीच झोपड्यांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असताना दुसर्‍या इमारतीच्या आवारातील कोसळलेले झाड हटवण्यासाठी झोपडीधारकांना १0 हजारांचा भुर्दंड बाधित झोपडीधारकांना बसणार आहे. भीमराव हनुमंता शास्त्री, सायन्ना हनुमंता बापूर, मरियप्पा हनुमंता बारला, मनीकम्मा हनुमंता कोनकाल, भरत गणपत मोरे, नरसाप्पा मैत्रे, गुंजीअम्मा अशप्पा कोंकल, साबन्ना साडक अशी बाधित झोपडीधारकांची नावे असून शासनाकडून आम्हाला मदत मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages