जाधव यांच्याविरोधात बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जाधव यांच्याविरोधात बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन

Share This
मुंबई : राज्य कामगार विमा योजना आयुक्त कार्यालयात अँट्रोसिटीचा धाक दाखवून आरोग्य विभागाच्या वरिष्ठांशी उर्मटपणे वागणारे तसेच प्रशासकीय गोपनीयतेचा भंग करणारे संचालक प्रशासन सी. के. जाधव यांना ताबडतोब बडतर्फ करून फौजदारी गुन्ह्याखाली अटक करा, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र बहुजन कर्मचारी संघाने १ जुलैपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात संघाच्या सरचिटणीस मोहिनी अणावकर, कार्यकारी अध्यक्ष नितीनभाऊ मोरे, प्रवीण बनसोडे, सचिन लोखंडे, सचिन खरात, जलाल शेख यांनी भाग घेतला.

कामगारांना सेवा देणारे क र्मचारी अल्प आहेत. अतिरिक्त काम सोपवल्यामुळे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कामगारांच्या वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. अशा स्थितीत काही असंतोषी व्यक्तींनी अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे उच्च अधिकार्‍यांचे खच्चीकरण होत आहे. ज्या अधिकार्‍यांनी रा.क.वि. योजनेत भ्रष्टाचार केला आहे त्यांना शासनाने शिक्षा दिली आहे, मात्र सी. के. जाधव उच्चपदस्थ अधिकार्‍यांना त्रास देत आहेत. जाधव सरकारची व रा.का.वि. योजनेची बदनामी करत आहेत. अशा या जाधवांविरोधात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला आहे.


दबावतंत्राचा अवलंब करून आयुक्त व संचालक पदावरील महिला अधिकार्‍यांना नाउमेद करून कामकाजात अडचणी निर्माण करून योजनेचा कारभार ठप्प करणे हे कदापि योग्य ठरणार नाही. या योजनेतील सर्व संवर्गातील संघटनांचा त्याला विरोध राहील. असेच सुरू राहिले तर सर्व संघटना समांतर आंदोलने उभे करतील, असे मुख्य प्रशासन अधिकारी अविनाश पाटील, डॉ. घायवट, दि. पां. महाक ाळ, प्र. द. पवले या कर्मचारी व अधिकार्‍यांनी स्पष्ट केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages