सिद्धार्थ महाविद्यालयात जादा शुल्क आकारले - प्राचार्यांवर कारवाही - राजेश टोपे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सिद्धार्थ महाविद्यालयात जादा शुल्क आकारले - प्राचार्यांवर कारवाही - राजेश टोपे

Share This
मुंबईतील सिद्धार्थ वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्यांनी २0१२-१३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याकडून प्रत्येकी २९७0 रुपये जादा शुल्क आकारल्याचे आढळून आले असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी प्रकाश बिनसाळे, रमेश शेंडगे आदींच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे विहित शुल्क ४७0 रुपये होते. जादा शुल्क घेतल्याबद्दल आझाद मैदान पोलीस ठाण्यास पुढील कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. कृष्णा पाटील यांना विश्‍वस्त मंडळाने निलंबित केले असून जादा शुल्क आकारणे बंद असल्याचेही टोपे यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages