556 शाळांमध्ये ग्रंथालय सुविधा सुरू करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

556 शाळांमध्ये ग्रंथालय सुविधा सुरू करणार

Share This
मुंबई - मुंबई महापालिकेच्या सर्व 556 शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. आजवर ही सुविधा 75 शाळांमध्येच होती. 

विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी 27 शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. याशिवाय विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी "व्हर्च्युअल क्‍लासरूम'ही सुरू करण्यात आले आहेत; परंतु ग्रंथालयासारखी आवश्‍यक सुविधा पालिकेच्या शाळांमध्ये नव्हती. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत ग्रंथालय असणे बंधनकारक आहे. याअंतर्गत "रूम टू रीड' या संस्थेच्या माध्यमातून पालिकेच्या अवघ्या 75 शाळांमध्ये सध्या ग्रथालय सुरू आहे. 

पालिकेच्या या प्रकल्पासाठी चार कोटी रुपये खर्च येणार आहे. ग्रंथालय नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमधील ग्रंथालयावर अवलंबून राहावे लागत होते; मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड त्यांच्या शाळेतच पूर्ण करता येईल. 

शिक्षण विभागाने शहर आणि उपनगरातील 636 शाळांमध्ये ग्रथालय सुरू करण्यासाठी यादी तयार केली होती; मात्र यातील 80 शाळा वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रंथालयात पुस्तकांचे तीन रॅक, ज्यूटचे दोन डिस्प्ले बोर्ड, सतरंजी आणि भित्तीपत्रकांचा समावेश असेल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages