मुंबई - रेल्वे प्रवासात होणाऱ्या पाकीटमारीमुळे प्रवासी त्रस्त असताना चोरट्यांनी आता एका पत्रकारालाही झटका दिला आहे. रेल्वेने कुर्ला ते घाटकोपर असा प्रवास करणारे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य राजू झनके यांचे 35 हजार रुपये असलेले पाकीट चोरट्यांनी लांबवले आहे. कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
झनके आज दुपारी रेल्वेने कुर्ला येथून घाटकोपर येथे कार्यालयात जात होते. त्या वेळी त्यांच्या पाकिटात कार्यालयातील तसेच वैयक्तिक अशी 35 हजार रुपयांची रोकड होती. कुर्ला ते घाटकोपर या सात मिनिटांच्या प्रवासात चोरट्यांनी त्यांचे पाकीट लांबविले. घाटकोपरला उतरल्यानंतर झनके यांनी पाकीट तपासले असता ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली असून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

No comments:
Post a Comment