स्वातंत्र्यसैनिकांशी आदराने वागा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वातंत्र्यसैनिकांशी आदराने वागा

Share This
मुंबई - स्वातंत्र्यसैनिकांना बेस्ट बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. बसमधून प्रवास करताना बेस्टचे वाहक स्वातंत्र्यसैनिकांशी हुज्जत घालून त्यांचा अवमान करतात. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन यापुढे स्वातंत्र्यसैनिकांशी आदराने वागा, त्यांचा अवमान करू नका, अशा सूचना बेस्ट प्रशासनाने वाहकांना दिल्या आहेत. 

स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र, राज्य आणि गोवा सरकारच्या गृह विभागाने ओळखपत्र दिले आहे. अशा स्वातंत्र्यसैनिकांना वातानुकूलित बस वगळता सर्वसाधारण बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यापूर्वी अवमान झाल्याच्या घटना घडल्या आहेत, अशा स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जाणार आहे. दादर पश्‍चिम येथे राहणारे द्वारकादास मेहता, वांद्रे पश्‍चिम येथील जेठालाल शहा, मालाड पश्‍चिम येथील एकनाथ बत्तासे, सानपाडा पूर्व येथील विश्‍वनाथ लोभ यांच्या निवासस्थानी जाऊन बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले हे त्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages