मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत तीन आठवड्यांत एकूण ७५ तास कामकाज झाले, तर वेगवेगळ्या कारणांमुळे २६ तासांचे कामकाज वाया गेले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी ही माहिती दिली. या काळात एकंदर ९८ तास कामकाज अपेक्षित होते. मंत्री उपस्थित नसल्यामुळे ५0 मिनिटे वाया गेली, तर अन्य कारणांमुळे २५ तास १0 मिनिटे वाया गेली. रोज सरासरी पाच तास २0 मिनिटांचे कामकाज झाले, असे ते म्हणाले.
या काळात एकूण १३0५ तारांकित प्रश्न स्वीकारले गेले. त्यापैकी ९२ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३च्या ८0 सूचना स्वीकारण्यात आल्या. त्यातील २४ सूचनांवर निवेदने झाली. २५ निवेदने पटलावर ठेवण्यात आली. विशेष उल्लेखाच्या ११७ सूचना, तर ४४ औचित्याचे मुद्दे मांडण्यात आले. २८१ लक्षवेधी सूचना मान्य करण्यात आल्या. त्यातील ४६ सूचनांवर चर्चा झाली. सात अल्पकालीन चर्चा मान्य झाल्या. त्यातील एका विषयावर चर्चा झाली. १२ शासकीय विधेयके संमत झाली. मंत्र्यांची आठ निवेदने झाली. नियम २६0 अन्वये तीन प्रस्ताव चर्चिले गेले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली, असे देशमुख यांनी सांगितले. येत्या ९ डिसेंबरला नागपूरमध्ये विधिमंडळाचे पुढचे अधिवेशन होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

No comments:
Post a Comment