मुंबईतील उड्डाणपुलांखालील पे अँण्ड पार्कचे परवाने रद्द - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील उड्डाणपुलांखालील पे अँण्ड पार्कचे परवाने रद्द

Share This
मुंबई : मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील उड्डाणपुलांखालील वाहनतळाला परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश २00८ साली काढण्यात आले होते. घातपातांची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मुंबईत सुरू असणार्‍या १२ पे अँण्ड पार्कचे परवाने रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभेत केली.

मुंबईत पे अँण्ड पार्कचे परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला. देवेंद्र फडणवीस, नितीन सरदेसाई आदी सदस्यांनी जयदत्त क्षीरसागर यांची चांगलीच कोंडी केली. मात्र पे अँण्ड पार्कला परवानगी देणार्‍या बैठकांना आपण उपस्थित नव्हतो, असे सांगत विरोधकांचे सर्व आरोप क्षीरसागर यांनी फेटाळून लावले. उड्डाणपुलाखाली वाहनतळांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिल्यानंतरही २00८ नंतर कशी परवानगी देण्यात आली. याची चौकशी करण्यासाठी पर्यावरण विभागाचे सचिव आर. ए. राजीव याच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून दोन महिन्यांत ही चौकशी पूर्ण केली जाईल. यात जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages