मेट्रो-२चे कास्टिंग यार्ड मेट्रो-३ साठी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रो-२चे कास्टिंग यार्ड मेट्रो-३ साठी

Share This
मुंबई : चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसर्‍या मेट्रो मार्गातील अनेक अडचणींमुळे कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्‍या मेट्रो मार्गाच्या कामाचा वेग वाढला असून मेट्रो-२ साठी ठरविण्यात आलेले कास्टिंग यार्ड आता मेट्रो-३ साठी वापरण्यात येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसर्‍या मेट्रो मार्गासाठी चारकोप येथील सेंट्रल बोर्ड डेव्हलपमेंट अँथोरिटी अर्थात सीपीडब्ल्यूएच्या अखत्यारितील जागा कास्टिंग यार्डसाठी ठरविण्यात आली होती. मात्र ही जागा सीआरझेड अखत्यारित येत असल्याने जोपर्यंत या जागेवरील बांधकामाबाबतच्या परवानग्या एमएमआरडीएकडून मिळत नाहीत तोपर्यंत त्या जागेवर काम करण्यास मेट्रो-२ चे कंत्राटदार रिलायन्स यांनी नकार दिला होता. त्यामुळे मेट्रो-२ चे काम अजूनही जैसे थे असून ते पुढे सरकण्याची शक्यता नाही. त्यातच सध्या एमएमआरडीएकडून मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू करण्यात आले असून जानेवारीपासून विविध कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्‍या पूर्णत: भुयारी मार्गासाठी आरे कॉलनी येथे कार डेपो उभारण्यात येणार आहे. त्यामुळे चारकोप येथील मेट्रो-२ च्या कास्टिंग यार्डचा उपयोग मेट्रो-३ साठी करणे सुलभ होणार आहे. मेट्रो-३ च्या कामाची सुरुवात कुलाबा येथून होणार असल्याने कास्टिंग यार्ड व कार डेपो ही वाहतूक सुलभ होणार असल्याचे एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages