मुंबई : पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा आणि मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा तसेच गेले अनेक वर्ष रखडलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाचे लोकार्पण होण्यास फेब्रुवारी-मार्च २0१४ उजाडणार असून प्रकल्पाला दोन महिने विलंब होणार असल्याचे मुंबई महागनर आयुक्त वल्सा नायर-सिंग यांनी सांगितले आहे.
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्प हा मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक असून एमएमआरडीएतर्फे निधी पुरवला जात आहे. या प्रकल्पामुळे विमानतळ, पूर्व पश्चिम उपनगरे त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पुणे, पनवेल आणि त्यापुढे प्रवास करणार्यांची उत्तम सोय होणार आहे. हा प्रकल्पाचे उद््घाटन १0 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. अरूंद रस्त्यावरील उड्डाणपूल, दुहेरी उड्डाणपूल, पुनर्वसन या प्रक्रियांमुळे प्रकल्प रखडला होता. सांताक्रुझ-चेंबर या प्रकल्पाची एकूण लांबी ६.४ किमी आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग असलेल्या कुर्ला-कलिना उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते ऑगस्ट २0१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून डिसेंबर २0१३ पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र मध्य रेल्वेच्या परवानगीमुळे या प्रकल्पास आणखी दोन महिने विलंब होणार असल्याचे नव्या महानगर आयुक्त वल्सा नायर-सिंग यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment