विवाह नोंदणी बंधनकारक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विवाह नोंदणी बंधनकारक

Share This
नवी दिल्ली : जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीप्रमाणेच आता विवाह नोंदणीही कायद्याने बंधनकारक करणार्‍या जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती २0१२ विधेयकाला राज्यसभेत आवाजी मतदानाने मंगळवारी मंजुरी देण्यात आली. विवाह नोंदणीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे ही नोंदणीही जन्म-मृत्यूप्रमाणेच बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र नोंदणी न करणार्‍यास कोणत्याही प्रकारच्या दंडाची तरतूद या विधेयकात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही राज्यांना त्यातील नियमांमध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र हे विवाह वैध आहे की अवैध हे ठरवण्याचा कोणताही अधिकार या विधेयकातून दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच संसदेने पारित केलेल्या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर न्यायालयाकडून त्याची पडताळणी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या २00६ रोजी दिलेल्या निर्वाळय़ाविरोधातही फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages