मुंबई : मालमत्ता कराच्या गुणांकांमध्ये तफावत असल्यामुळे गुणांक जास्त असल्याच्या बहुतांश तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपसमिती नेमून त्याचा सर्वंकष अभ्यास करावा आाणि २0१४-१५ मध्ये त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
मालमत्ता कराचा मनपाच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे.नव्या मालमत्ता करप्रणालीबाबत मुंबईकर नागरिकांच्या मनात अद्यापही शंका आहेत. त्यामुळे या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थायी समितीची बुधवारी बैठक बोलावण्यात आली होती.या वेळी अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. नव्या करप्रणालीनुसार मालमत्ता करामध्ये वाढ झाली आहे. वर्ष २0१२ पासून या कराराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याबाबतचा करार करण्यात आला. कराराच्या गणनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. याबाबतची माहिती दोन महिन्यांनंतर उपलब्ध होईल. परतावा करण्याबाबत एकूण ११ हजार प्रकरणे आहेत. यासंबंधी पालिकेकडे ८९८ कोटी रुपये जमा असून त्यासाठी जवळपास १३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पावणेआठ हजार अर्जांवर कार्यवाही सुरू असून उर्वरित काम दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त जलोटा यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment