ताप, मलेरियाच्या रुग्णांत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ताप, मलेरियाच्या रुग्णांत वाढ

Share This
मुंबई : मुंबईत जुलै महिन्यापेक्षा ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसांत ताप आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्वाईन फ्ल्यूचे जुलैमध्ये दोन रुग्ण आढळले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात पहिल्या चार दिवसांतच एक रुग्ण आढळला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालातच ही बाब स्पष्ट झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्यात ६२६४ तापाचे रुग्ण आढळले होते. याचा अर्थ दिवसाला किमान २0८ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्ट महिन्यात पहिल्या चार दिवसांतच १२२४ रुग्ण आढळले आहेत. याचा अर्थ दिवसाला ३0६ रुग्ण आढळून आले आहेत, तर जुलै महिन्यात मलेरियाचे १२६२ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत २0३ रुग्ण आढळले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages