पेण्टाग्राफला चिकटून तरुण ठार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेण्टाग्राफला चिकटून तरुण ठार

Share This


कल्याण : लोकलच्या टपावर चढलेला तरुण पेण्टाग्राफला चिकटून ठार झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी घडली. सीएसटीहून टिटवाळ्याला जाणारी लोकल सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. त्या वेळी एक तरुण लोकलच्या थेट टपावर चढला आणि लोकल सुरू होण्याच्या बेतात असताना तो पेण्टाग्राफला चिकटला. या घटनेमुळे कल्याण रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाची ओळख अद्यापि पटू शकली नाही. या प्रकरणी अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे टिटवाळा लोकल काही काळ कल्याण रेल्वे स्थानकात खोळंबली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages