परळ टर्मिनसची वाट पाहावी लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परळ टर्मिनसची वाट पाहावी लागणार

Share This
मुंबई : परळ येथे उभारण्यात येत असलेल्या उपनगरी रेल्वे गाडीच्या टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाची परवानगी मिळाली की येत्या दोन वर्षांत परेल टर्मिनलची उभारणी करण्यात येणार असली तरी परेल टर्मिनससाठी मुंबईकरांना आणखी काही वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. परळ टर्मिनलचा प्रकल्प मध्य रेल्वेतर्फे मंजूर करण्यात आलेला आहे. परळ टर्मिनलच्या उभारणीसाठी सुमारे ६0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २00 कोटी रुपये देऊ करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यापासून परळ टर्मिनलच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु परळ टर्मिनलचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत परळ टर्मिनलचे काम करता येणार नाही. रेल्वे बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर पुढील दोन वर्षांत परळ टर्मिनलचे काम पूर्ण करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समजते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages