महाराष्ट्रामधील शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून भारतीय संविधानाची ओळख व्हावी म्हणून ४ फेब्रुवारी रोजी जी आर काढून सर्व शाळांनी प्रार्थनेच्या वेळेत संविधानाच्या सरनाम्याचे दररोज वाचन करावे. शाळांच्या दर्शनी भागात संविधानाचा सरनामा ठळकपणे भिंतीवर व कायमस्वरूपी फलकावर लावावा, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधान यात्रा, संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा, चित्रकला, निबंध, घोषणा पत्र, समूहगान, आदी स्पर्धा तसेच या विषयावर तज्ञांचे व्याख्यान आयोजित करावे असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी संविधानाच्या सरनाम्याचे व प्रास्ताविक वाचन करणे बंधनकारक केले असले तरी बहुतांश शाळांमध्ये असे वाचन केले जात नाही. प्रार्थनेचा वेळ आणखी वाढेल या कारणामुळे असे संविधान वाचन करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कित्तेक शाळांच्या मुख्याध्यापकांना असे काही आदेश आहेत हे सुद्धा माहित नाही.
राज्यातील अनेक शाळांमध्ये सरस्वती वंदना बोलून घेण्यास वेळ काढला जात आहे परंतु शासनाने जे आदेश काढले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यास शाळांना वेळ नसल्याचे दिसत आहे. अनेक शाळांमध्ये प्रार्थनेमध्ये पहिल्या तासाची वेळ, हजेरी घेण्यामध्ये वेळ जात असल्याचे कारण दिले जात आहे. पहिल्या तासाची वेळ प्रार्थना व हजेरी मध्ये वेळ जात असल्याने पहिल्या तासावर आणखी अन्याय नको असे सांगून संविधान वाचन करण्यास टाळाटाळ होत आहे.
राज्य सरकारने जीआर काढून सर्व शाळांना आदेश दिले असले तरी मोजक्या काही शाळांकडूनच हे आदेश पाळले जात आहेत इतर बहुतेक शाळांकडून शासनाचे आदेश पाळलेच जात नसल्याने शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने कोणत्या शाळेवर कारवाही केली असे सुद्धा निदर्शनास येत नाही. शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक कार्यालयाने राज्य सरकारचे आदेश शाळांमधून पाळले जातात का याचे निरीक्षण करण्याची गरज आहे. सणाचे आदेश पाळण्यास शाळा दुर्लक्ष करत असल्यास शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक कार्यालयाने अशा शाळांवर कारवाही करण्याचे गरजेचे आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतील शाळा सुद्धा येतात. पालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा अशा प्रकारे भारतीय संविधान वाचन होताना दिसत नाही. पालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये सुद्धा राज्य सरकारने काढलेले आदेश पाळले जातात का संविधान वाचले जाते का यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. पालिका शाळांमध्ये संविधान वाचले जात नसल्यास राज्य सरकारने काढलेले आदेश पालिका शाळांमध्ये कसे पाळले जातील हे पालिकेच्या शिक्षण विभागाने पाहून कार्यवाही करण्याची गरज आहे.
राज्य सरकारने संविधानाच्या प्रास्ताविक व सरनाम्याचे वाचन करण्याचे आदेश जी आर काढून काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी बहुतेक शाळांमधून केली जात नसल्याने संविधान प्रेमी जनतेने अशा शाळा आदेशाची अंमलबजावणी कशा प्रकारे करतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आदेशाची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांची नावे शालेय शिक्षण विभागाला कळवून त्यांच्यावर कारवाही करणे गरजेचे आहे. आदेशांची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या काही शाळांवर शिक्षण विभागाने कारवाही केल्यास इतर शाळांमधून संविधान वाचन योग्य प्रकारे होऊ शकते.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment