स्वयंपाकाच्या gas चा काळाबाजार उघड … - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वयंपाकाच्या gas चा काळाबाजार उघड …

Share This
रेशनीग अधिकाऱ्यांची सलग २० तास चालली कारवाई .
http://jpnnews.webs.com ( NEWS website )
१७ ऑगस्ट २०१३ = मुंबई / अंधेरी / रशिद इनामदार

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई , जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत चाललेल्या किमती यामुळे त्रस्त झालेली जनता . अशा परस्थितीत स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला gas च्या काळाबाजाराचा निंदनीय प्रकार किरणभाऊ  घोडके या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने उघडकीस आणला आहे .
   अंधेरी पश्चिमेला असलेल्या अपना बाजार या सहकारी संस्थेशी सलग्न असलेल्या gas वितरक करत असल्याचे स्थानिकांनी निदर्शानस आणून दिली . त्यानंतर किरणभाऊ घोडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने आवश्यक माहिती गोळा केली . त्यात त्यांना ग्राहकांची यादी आणि काही खोट्या ग्राहकांच्या gas वितरीत केलेल्या पावत्या मिळाल्या .त्यांनी तशी तक्रार रेशनिंग खात्याकडे केली . त्यानुसार खात्याचे उपनियंत्रक सर्जेराव सोनावणे यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत हा वितरक दोषी आढळून आला . कागदोपत्री खोटे ग्राहक दाखवून मिळणारे gas सिलेंडर काळ्याबाजाराने दुप्पट,तिप्पट किमतीने विकले जात होते . बहुतेकदा अशा गोष्टींमुळे खरया ग्राहकांना मात्र सिलेंडर उशिरा मिळत होता . 
    हि कारवाई १६ तारखेला संध्याकाळी सुरु झाली १७ तारखेला सकाळी ९ वाजेपर्यंत सलग कारवाई करण्यात आली . त्यानंतर आंबोली पोलिस स्थानकात संबंधित वितरकाविरोधात जीवनावश्यक वस्तूंचा कायदा तसेच विनापरवाना स्फोटक वस्तूंचा साठा या गुन्ह्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे अशी माहिती अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली .  
   एच पी कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या वितरकाने कंपनीला कोणत्याही प्रकारची माहिती न देता इतर व्यक्तींना भाडेतत्वावर चालविण्यासाठी दिल्याचे हि यावेळी सर्जेराव सोनावणे यांनी सांगितले .ते पुढे म्हणाले प्रथमदर्शनी केलेल्या तपासणीत ६ ग्राहक खोटे असल्याचे आढळून आले आहेत .  असे प्रकार मुंबई , नवी मुंबई आणि परिसरात होत असल्याचे चर्चा सध्या सुरु आहे 
   वितरकाचे ग्राहक खरे कि खोटे याचा शहानिशा करण्यासाठी अधिकारी रात्री उशिरा ग्राहकांच्या घरी पोहचले त्यांचा तेथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाशी व रहिवाश्यांशी वाद झाला . अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र दाखवण्याची  मागणी रहिवाशांनी केली. अधिकारी ओळखपत्र न्यायला विसरले होते . तेंव्हा रहिवाश्यांनी आपला मोर्चा या वितरकाच्या कार्यालयाकडे वळवला . त्याठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी व वृत्त संस्थांच्या प्रतिनिधींनी रागवलेल्या रहिवाश्यांची समजूत काढली . रहिवाशांच्या मनातील संभ्रम दूर झाला व वाद मिटला ।   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages