मागासवर्गीय समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मागासवर्गीय समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही

Share This
मुंबई : मुस्लीम, ख्रिश्‍चन, खाटीक, मेहतर या समाजाला आजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये घटनेमधील तरतुदीप्रमाणे फायदे मिळत नाहीत. आजही हा समाज मागासलेलाच आहे. यासाठी आता विविध संघटना, संस्था, स्थानिक पक्ष यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत बुधवारी आमदार अबू आझमी यांनी पत्रकार संघ येथे व्यक्त केले. या वेळी आमदार कपिल पाटील व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आता सरकारशी चर्चा नाही, आता आंदोलनच. अशी भूमिका घेत आमदार अमीन पटेल, अवामी विकास पार्टीचे इरशद खतीब, समशेर खान पठाण, सरफराज आरजू, हाजी हसनुद्दीन, खाटीक समितीचे हनीफ शेख, अँड़ यासमीन शेख, निसार तुंबली, मेराज सिद्दीकी आदी पदाधिकार्‍यांनी आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन करण्याचा इशारा दिला. सरकार चर्चेने या समाजाला काही देणार नाही त्यासाठी आंदोलनच करावे लागणार आहे, असा सूर या वेळी आळवला गेला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages