मुंबई : मुंबईकरांना विद्युतपुरवठा करणार्या आणि परिवहन सेवा देणार्या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत वितरण संचामध्ये काही बिघाड झाल्यास, विजेचा धक्का लागल्यास, स्फोट झाल्यास घडलेल्या प्राणांतिक अथवा अन्य प्रकारच्या अपघातात सापडलेल्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते. अशा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला बेस्ट प्रशासनातर्फे ३0 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. परंतु सध्याच्या महागाईत एवढी तुटपुंजी मदत देणे योग्य नसल्याने आर्थिक नुकसान म्हणून देण्यात येणार्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या विद्युत उपकरणाचा धक्का लागून अथवा बेस्ट बसच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत बेस्टतर्फे देण्यात येते. परंतु ही नुकसानभरपाई देताना त्या व्यक्तीच्या रोजगाराचा आणि त्याच्यावर अवलंबून असणार्या कुटुंबाचा विचार करण्यात येतो. मुंबईमध्ये १९९0 साली मुंबादेवी येथील टॅन्क उपकेंद्रातील १000 केव्हीएच्या रोहित्र टाकीचा स्फोट झाला होता. त्या वेळी स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार आणि राज्य शासनाच्या उद्योग, ऊ र्जा व मजूर विभागाच्या सचिवांनी मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला ३0 हजार रुपये, तर कायम संपूर्ण अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ४२ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे बेस्ट प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आले होते.परंतु सध्याच्या महागाईच्या जमान्यात ज्या कुटुंबाचा आर्थिक आधार असलेली व्यक्ती जर अशा अपघातात मृत्युमुखी पडली तर तिच्या कु टुंबाला देण्यात येणारी आर्थिक नुकसानभरपाईची मदत काही प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. त्यानुसार मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला किमान ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक मदत वाढविण्यात येत असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:
Post a Comment