प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य

Share This
मुंबई : विद्यार्थ्याला घडवणारा गुरू म्हणजे सर्वार्थाने त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारा असतो. त्यामुळे आधी गुरू सर्वज्ञानसंपन्न असला पाहिजे. हीच बाब हेरून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक आणि दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. अशाप्रकारे आता राज्यातील शिक्षकांची एक प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीच होणार आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक आणि दज्रेदार शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्वत्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनामार्फ त सध्या सुमारे १ लाख प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू असून त्यात सुमारे १ लाख ८0 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या १ लाख शाळांपैकी सुमारे ३२ हजार ५७३ शाळा खाजगी आहेत. ज्यांमध्ये २0 हजार ४५५ अनुदानित, तर १२ हजार १८ शाळा या विनाअनुदानित आहेत. या विद्यार्थ्यांचे आयुष्य योग्य मार्गाने जावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत २00२ साली दुरुस्ती करून ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण त्यांचा मूलभूत अधिकार केला आहे. त्या अनुषंगाने गुणात्मक आणि दर्जात्मक शिक्षक मिळणे हादेखील मुलांचा हक्कच आहे. हे लक्षात घेता शिक्षकपदावर नियुक्तीसाठी पात्रता आणि सेवा शर्ती ठरवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. या राष्ट्रीय शिक्षण परिषदेनेच प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता निश्‍चित करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य केली आहे. ही परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
किमान ६0 टक्के गुण आवश्यक
शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कनिष्ठ प्राथमिक (१ली ते ५वी) आणि वरिष्ठ प्राथमिक (इ. ६वी ते ८वी) या दोन गटांतील शिक्षकांसाठी प्रत्येकी स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराला दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक असून परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६0 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages