मुंबईत खड्ड्यांना आयुक्तांची नावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत खड्ड्यांना आयुक्तांची नावे

Share This
मुंबई : रस्त्यांवरील खड्डय़ांवरून वातावरण तापत असतानाच पालिका प्रशासनाकडून गुरुवारी स्थायी समितीतही २५ ऑगस्टपर्यंत मुंबईतील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन दिले आणि तापलेले वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेकडून खड्डय़ांविरोधात अनोखे आंदोलन करत खड्डय़ांना आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची नावे देत आपला रोष व्यक्त करण्यात आला.

खड्डय़ांच्या प्रश्नावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर स्थायी समिती अध्यक्षांना राजीनामा नाट्य रंगवावे लागले होते. स्थायी समितीतही विरोधकांकडून या प्रश्नावरून सत्ताधारी तसेच प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. याच सभेत सल्लागार कंपनीचा प्रशासनाकडून आणलेला प्रस्ताव सर्व सदस्यांनी विरोध करत दप्तरी दाखल केला. दरम्यान, मनसेकडून खड्डय़ांच्या प्रश्नावर आक्रमक रूप धारण करत कंत्राटदारांना चोप देणे, अधिकार्‍यांना शिवीगाळ करणे, डांबून ठेवणे आदी प्रकारे आंदोलन केले गेले. शुक्रवारी तर मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली खड्डय़ांना प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नावे नामकरण करत अनोखे आंदोलन करण्यात आले. यामध्ये कुर्ला विभागात नगरसेवक दिलीप लांडे, ईश्‍वर तायडे, घाटकोपर विभाग तसेच भांडुप विभागात नगरसेविका वैष्णवी सरफरे, रूपेश वायंगणकर, शाखाध्यक्ष अशोक माटेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages