२५ ऑगस्टपूर्वीच खड्डे बुजवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२५ ऑगस्टपूर्वीच खड्डे बुजवणार

Share This
मुंबई : संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे २५ ऑगस्टपूर्वी बुजवण्याचा विडा उचलणार्‍या पालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते, आदी प्रशासन यांच्यासह बुधवारी संयुक्त सभा घेण्यात आली. या वेळी २५ ऑगस्टपर्यंत विविध प्राधिकरणांना मुंबईतील आपापल्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना करण्यात आल्या. या प्राधिकरणांनी खड्डे बुजवले नाहीत तर हे खड्डे पालिका बुजवेल आणि हे पैसे त्या त्या प्राधिकरणांकडून वसूल केले जातील, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.

बुधवारी प्रशासनाकडून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासन प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले होते. या वेळी स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी मोनो, मेट्रो रेल्वे तसेच स्कॉयवॉकसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजवले गेले नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच इतर प्राधिकरणांकडे असलेले मुंबईतील सर्व रस्ते पालिकेने ताब्यात घेऊन त्यावरील खड्डे पालिकेनेच बुजवावेत, अशी सूचना केली. मुंबईतील पूर्व व पश्‍चिम द्रुतगती मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असल्याच्या तक्रारी या वेळी केल्या गेल्या. या वेळी सर्व प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांनी आपल्या ताब्यात असलेल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे २५ ऑगस्टपूर्वी भरले जातील, असे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages