कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी नोटीस

Share This
मुंबई : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडसाठी परवानगी देताना घातलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या ग्राऊंडवर १२ फुटांची संरक्षण भिंत बांधताना केंद्र सरकारकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच भरणीमुळे खारफुटीच्या जंगलांची वाढ खुंटल्याने नव्याने कोणतेही बांधकाम न करता 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या डम्पिंग ग्राऊंडसभोवतालच्या कांजूर व्हिलेज, कन्नमवार नगर, टागोर नगर, भांडुप व्हिलेजमधील रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास होत असल्याचा आरोप करून अँड़ स्नेहल परांजपे आणि अँड़ साजन पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या डम्पिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये महापालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या याचिकेवर बुधवारी म्हणजेच ७ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages