मुंबई : जमिनीची उपलब्धता तेवढीच आहे. त्यामध्ये धान्योत्पादन वाढवण्याची नितांत गरज आहे. तरच वाढत्या लोकसंख्येला धान्याचा पुरवठा होईल. नाहीतर धान्याची आयात करावी लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर किरणोत्सर्गाच्या माध्यमातून मूळ जातीचा वाणावर प्रक्रिया करण्यात येत आहे. किरणोत्सर्गाचा बियाण्यांवरील परिणाम मानवी शरीरास हानीकारक नाही. त्यामुळे जनतेने न्यूक्लिअर ऊर्जाबाबत होणार्या बी-बियाणे, सागरी उत्पादन आदीवर सुरू असलेल्या प्रयोगास साथ देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत बायो मेडिकल ग्रुपचे संचालक डॉ. के . बी. साईनिस यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे व्यक्त केले.
बीएआरसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रयोगाद्वारे ४१ बी-बियाणे, सागरी जीव यांच्यावर प्रयोग करून उत्पादन वाढ करण्यात आली आहे. भविष्यात कडधान्याच्या विविध जाती, उदा. मूग या कडधान्याच्या आठ जाती, उडीद , तूर, जवस, तांदूळ यांचे उत्पादन वाढवण्याचे कार्य सुरू आहे. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभाग व बीएआरसीच्या माध्यमातून सुरू असलेले हे प्रयोग इतर देशातही होत आहेत. आपणास कडधान्याची मोठय़ा प्रमाणात आयात करावी लागत आहे. आपण आता गव्हाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात करतोय. त्याच प्रकारे कडधान्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. किरणोत्सर्गाचा परिणाम मानवी शरीरावर काही होत नाही. आंतरराष्ट्रीय मान्यता असणारा हा प्रयोग मानवाच्या कल्याणासाठीच आहे, असे साईनिस यांनी सांगितले. या वेळी वनस्पती शास्त्रज्ञ सुरेश भागवत, प्रयोग जनजागृती विभागाचे मुख्य अधिकारी आर. के. सिंग आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment