एमयूटीपी प्रकल्प-२ मध्ये देणार १२0 कोटी
मुंबई : उपनगरीय रेल्वेवर होणार्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वाधिक अपघात होणार्या रेल्वे स्थानकांचा शोध घेण्यात आला असून त्यासाठी जागतिक बँकेने तब्बल १२0 कोटी रुपयांचा निधी देऊ केलेला आहे.
मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दिवसाला सरासरी १0 अपघात होतात. त्यामध्ये सर्वाधिक अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना होतात. मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ (एमयूटीपी) अंतर्गत जागतिक बँकेकडून १२0 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ११ रेल्वे स्थानकांचा सर्व्हे केला आहे. एमआरव्हीसी आणि जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कन्सल्टन्सी सेलला ट्रॅक पासिंगसंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. जे.जे.ने पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील एकूण ११६ रेल्वे स्थानकांपैकी ११ स्थानकांचा अभ्यास केला आहे. या अहवालामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, वसई रोड, नालासोपारा तर मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, कांजूरमार्ग, ठाणे, ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांचा अभ्यास केला आहे.
प्रवासी काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी, पादचारी पुलांची लांबी जास्त असल्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांना-अपंगांना पादचारी पुलावर जाण्यासाठी पायर्या चढता येत नसल्यामुळे, लोकल कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची घोषणा शेवटच्या क्षणी झाल्यामुळे, टीसीला चुकवण्यासाठी, गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मच्या बाजूने लोकलमध्ये चढणे शक्य नसल्यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ट्रॅक क्रॉसिंगच्या घटना कमी करण्यासाठी काही उपाययोजनाही या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पादचारी पुलांची रचना, रेलिंग आणि आरसीसी वॉलची नोंद करण्यात आली आहे. या उपाययोजना रेल्वेने केल्या तर ट्रॅक पासिंगच्या घटना ७५ ते ८0 टक्के कमी होण्यास मदत होईल, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ज्या रेल्वे स्थानकांवर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्या स्थानकांच्या सर्व्हेसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार अपघात रोखण्यासाठी वर्ल्ड बँकेने दिलेल्या १२0 कोटी रुपयांतून प्रयत्न केले जाणार आहेत.

No comments:
Post a Comment