महापालिकेतील अधिकाऱयांच्या मालमत्तेचे विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेतील अधिकाऱयांच्या मालमत्तेचे विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

Share This
बृहन्मुंबई महापालिकेतील गट ‘अ’  आणि गट ‘ब’  मधील अधिकाऱयांचेमालमत्तेचेव दायित्वाचे विवरणपत्र महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ‘माहितीचा अधिकार अधिनियम’ या
टॅबमध्ये ‘कर्मचाऱयांच्या मालमत्तेचा तपशील’ या नावानेप्रसिद्ध करण्यात आलेआहे. गट ‘अ’  आणि गट ‘ब’ मधील अधिकाऱयांपैकी अधिपरिचारिका,  पाठ्यनिर्देशिका,  परिसेविका, प्रशिक्षक (पदवीधर)  या संवर्गातील कर्मचारी वगळून ज्यांचा ग्रेड पे ४३०० वा त्यापेक्षा अधिक आहे त्यांची विवरणपत्रे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक)  नियम १९९९ च्या नियम १८ नुसार ज्यांची किमान वेतनश्रेणी मुख्य लिपिकाच्या किमान वेतनश्रेणीहून कमी नाही अशा प्रत्येक कर्मचाऱयांना विहित प्रपत्रामध्येत्याच्या मालमत्तेचेव दायित्वाचेविवरण सादर करणेआवश्यक असते. महानगरपालिका प्रशासनामध्येजास्तीत-जास्त पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. सीताराम कुंटेयांच्या आदेशानेमहानगरपालिकेतील गट ‘ब’ व त्यावरील अधिकाऱयांनी त्यांचे मालमत्तेचेव दायित्वाचेविवरणपत्र महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक क्र.  एमपीएम/दोन/७७५६,  दिनांक २९.१०.२०१२,  परिपत्रक क्र. एमपीएम/दोन/९३५१, दिनांक १३.०५.२०१३, परिपत्रक क्र. एमपीएम/दोन/९३५२, दिनांक २०.०५.२०१३ आणि परिपत्रक क्र. एमपीएम/दोन/९६०५, दिनांक ११.०६.२०१३ अन्वयेनिर्देश देण्यात आलेआहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages