मनसे कार्यालयाला पालिकेची नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनसे कार्यालयाला पालिकेची नोटीस

Share This
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर येथील कार्यालयात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर मनसे कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, जी-उत्तर विभागातून कलम 351 अन्वये नोटीस पाठविण्यात आली आहे. 

मनसेचे नगरसेवक गिरीश धानुरकर यांनी महापालिका अभियंत्याला जाखादेवी चौकाशेजारील कार्यालयात बोलावून मारहाण केली होती. या प्रकारानंतर मनसेच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामाकडे महापालिकेचे लक्ष गेले आहे. या कार्यालयातील पोटमाळा बेकायदा असल्याची तक्रार आली असून, त्यानुसार नोटीस पाठविण्यात आल्याचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. या पोटमाळ्यावर कारवाई करताना इतर बेकायदा बांधकामांचीही माहिती घेण्यात येईल, असे ते म्हणाले. धानुरकर यांना निलंबित करण्याची मागणी महापालिका अभियंत्यांनी केली होती. त्यातच आता मनसेच्या दुसऱ्या गटाने ही तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेला चांगलीच संधी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages