मुंबई – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन २०१३-१४ या वर्षाकरिता पूर्वतयारी, बी.ए., बी.कॉम., वृत्तपत्रविद्या पदविका व पदवी या शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत १६ ऑगस्ट २०१३ पर्यंत विनाविलंब शुल्क वाढविण्यात आली असून, ३१ ऑगस्ट पर्यंत २००रु. विलंबशुल्कासहित प्रवेश सुरु आहेत.
जुलै महिना अखेर सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणींना सामोरे जावे लागले, विद्यार्थ्यांना मागणीस्तव व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ केली आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांनी वरील शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दादर येथील कीर्ती महाविद्यालय, चर्नी रोड येथील पी.डी.हिंदुजा महाविद्यालय, बांद्रा येथील नॅशनल महाविद्यालय इत्यादी अभ्यासकेंद्रांवर संपर्क साधावा. प्रवेशासंदर्भात माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या http://ycmou. digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२३८७४१८६ किंवा ०२२- २३८७४१८७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ.प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment