क्लीन अप मार्शलने केली दोन कोटींची वसुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

क्लीन अप मार्शलने केली दोन कोटींची वसुली

Share This
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पुन्हा सुरू केलेल्या क्लीन अप मार्शलद्वारे गेल्या ४0 दिवसांत तब्बल २ कोटी २0 लाख रुपयांची वसुली केल्याची माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांनी दिली. ही योजना पुन्हा सुरू करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर या योजनेला कडाडून विरोध झाला होता, मात्र क्लीन अप मार्शलने पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम नव्याने हाती घेतली असून या मोहिमेद्वारे आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून सन २00७ रोजी मुंबईतील स्वच्छता कायम राखण्यासाठी क्लीन अप मार्शल ही योजना सुरू करण्यात आली होती, मात्र मधल्या काळात या क्लीन अप मार्शलकडून जनतेला त्रास दिला जात असून, बळजबरीने दंड वसूल केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नगरसेवकांकडून ही योजनाच बंद करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. परिणामी, प्रशासनाकडून ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र मुंबईतील स्वच्छता महत्त्वाची असल्याने तसेच लोकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने गेल्या दोन महिन्यांपूर्वी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार एक संशोधनात्मक मार्ग म्हणून शहरातील विविध विभागांत खाजगी सुरक्षा रक्षक संस्थांकडून क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली. मुंबईत एकूण १२ सिक्युरिटी कंपन्यांना क्लीन अप मार्शलचे कंत्राट देण्यात आले असून, रस्त्यांवर नैसर्गिक विधी, आंघोळ करणे, थुंकणे, कचरा टाकणे, जनावरांना खाऊ घालणे, कचर्‍याचे वर्गीकरण न करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे मल विसर्जन इत्यादींसाठी दंड आकारण्याचे अधिकार क्लीन अप मार्शलला देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages